नगर, (दि.12 नोव्हेंबर) : जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आठ पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक व एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. दरम्यान, नगर शहरातील महत्वाचे पोलिस ठाणे म्हणून ओळखल्या जाणार्या कोतवाली पोलिस ठाणे येथे राकेश मानगांवकर यांची बदली झाली आहे. दरम्यान, एलसीबीत (स्थानिक गुन्हे शाखा) अद्याप पोलिस निरीक्षकाची नियुेी करण्यात आलेली नाही.
एलसीबीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांची पुण्याला बदली झाल्यापासून ही जागा रिक्त आहे.बदली झालेले पोलिस निरीक्षक पुढील प्रमाणे- अभय परमार संगमनेरहून नियंत्रण कक्षात, मुकुंद देशमुख राहुरीहून संगमनेर, हनुमंत गाडे साई मंदिर येथून राहुरी, प्रभाकर पाटील जामखेडहून नियंत्रण कक्षात, अविनाश शिळीमकर नियंत्रण कक्षातून नगर शहर वाहतूक शाखा व सुहास चव्हाण नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखा. बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे-प्रकाश पाटील लोणीहून नगर शहर वाहतूक शाखा, समाधान पाटील श्रीरामपूरहून लोणी.
