यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष वैभव ढाकणे, माजी नगरसेवक संभाजी पवार, संघटक राजेश भालेराव, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, शेखर राठीया, युवकचे तन्वीर मणियार उपस्थिती होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात युवतींना मानाचे स्थान असून, प्रमुख पदांसह विविध महत्त्वाची जबाबदारी युवती व महिलांवर सोपविण्यात आली आहे. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात युवती सक्षम व निर्भय होण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. महिला राजकारणात देखील आपले कर्तुत्व सिध्द करीत आहे.
युवतींनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावे, याच भावनेने जिल्ह्यातील महिला व युवती पदाधिकार्यांना संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.माणिक विधाते यांनी युवतीच्या नुतन पदाधिकारीस पुढील वाटचालीस शुभेच्छा देत युवतींच्या प्रश्नावर कार्य करण्याचे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना युवतीच्या नवनिर्वाचित शहर जिल्हा उपाध्यक्षा सुजाता दिवटे यांनी युवतींचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असून, यासाठी शहरातील युवतींना संघटीत करण्याचा संकल्प व्यक्त केला.