लाड सुवर्णकार श्री विठ्ठल मंदिरात त्रिपुरारी दिपोत्सव

 

नगर, (दि.30 नोव्हेंबर) :त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे लाड सुवर्णकार समाजाच्या कोर्टगल्ली येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हरिओम भजनी मंडळाने  केलेल्या  दिपोत्सवाने मंदिर परिसर उजळून निघाला. दररोज पहाटेच्या काकड आरतीपासून दिवभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे  आयोजन  यावेळी  करण्यात  आले. 

 

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गाभार्‍यातील श्री विठ्ठल-रुख्मिणी, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या श्री मूर्तीला आकर्षक लोण्याचा पोषाख करण्यात आला. आकर्षक व भव्य रांगोळी व सभोतली दिव्यांची सजावट यामुळे मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.


यावेळी सुनिता कुलट, छाया लखारा, संगीता बेरड, मंगल डागवाले, सिंधूबाई सुडके, शालिनी राठोड, सुमन मोकाटे, श्रीमती शहरकर, वंदना शहरकर, मिनाक्षी उदमले, स्नेहा राठोर यांनी या त्रिपुरारी उत्सवात सक्रिय सहभाग घेतला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाड सुवर्णकार समाज अध्यक्ष संजय देवळालीकर, विश्‍वस्त मुकुंद निफाडकर,  प्रकाश देवळालीकर आदिंचा सहयोग लाभला. याप्रसंगी असंख्य भाविकांनी उत्सवास भेट  देऊन  दर्शन  घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post