नगर, (दि.30 नोव्हेंबर) : लोणी येथील पीएमटी कॅन्टीनच्या शॉपमधून एका युवकाचा मोबाईल चोरणार्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे.
हौशीराम सीताराम आंत्रे (रा.सोनगाव सात्रळ,ता.राहुरी) असे आरोपीचे नांव आहे.
अभय विजय जाधव (रा.लोणी बु्रदुक ता.राहता यांचा मोबाईल) दि.14 मे रोजी चोरट्यानी पळवला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीबाबत माहिती मिळाली.
त्यांनी राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्हयाची कबुली दिली असून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे.
