जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने
नियोजित शहीद स्मारक येथे हॉलीबॉलचे मैदान भूमीपूजन
नगर, (दि.09 नोव्हेंबर) : माजी सैनिकांनी पुढाकार घेऊन जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून तपोवन रोड येथे साकारण्यात येणार्या नियोजित शहीद स्मारकाच्या आवारात खेळाडूंसाठी हॉलीबॉलचे मैदान उभारण्यात आले. या मैदानाचे भूमीपुजन नगरसेवक सुनिल त्रिंबके यांच्या हस्ते झाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे, रघुनाथ औटी, बंडू पवार, मयुर नवगीरे, प्रतिक शिंदे, प्रसाद शिंदे, जय हिंदचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृत्ती भाबड, जगन्नाथ जावळे, शिवाजी गर्जे, संभाजी वांढेकर, सुनिल गुंजाळ, संदिप कराड, बन्सी दारकुंडे, गणेश पालवे, संजय पाटेकर, विठ्ठल लगड, बाबासाहेब भवर, सचिन दहिफळे, अंकुश भोस, अमोल निमसे, कैलास कुर्हाडे, गोविंद आंधळे, भाऊसाहेब देशमाने, शांतीलाल सानप, नवनाथ वारे, उद्धव थोटे, महादेव झिरपे, सुरेश बडे, महादेव शिरसाठ, जितेंद्र जोशी, गणेश अंधारे, वाल्मिक कोहक, भरत शिरसाठ आदि उपस्थित होते.
नगरसेवक सुनिल त्रिंबके म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक उपक्रम घेऊन माजी सैनिक देश सेवा करीत आहे. माजी सैनिकांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत कौतुकास्पद आहे. शहरा जवळ होत असलेले शहीद स्मारक युवकांना प्ररणा देणारे असून, या स्मारकाच्या माध्यमातून अनेक देशसेवा करणारे युवक घडणार आहे. उपनगर भागात मैदान उपलब्ध नसल्याने आवड असून देखील एखादे खेळ खेळता येत नाही. कोरोनामुळे मैदान बंद असल्याने खेळाडूंची मोठी गैरसोय झाली होती. क्रीडांगण खुली झाल्याने खेळाडूंना सराव करता येणार आहे.
हॉलीबॉलचे या मैदानातून देखील अनेक उत्तम खेळाडू घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी नियोजित शहीद स्मारक उभे राहून युवकांना सैन्यात दाखल होण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यासिका व खेळाडूंना मैदान उपलब्ध करुन एक सशक्त युवा पिढी घडविण्याचा जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत निवृत्ती भाबड यांनी केले. आभार नवनाथ वारे यांनी मानले.
