पाईपलाईन रोडवर बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न


नगर, (दि.12 नोव्हेंबर) :  सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटमध्ये असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम अज्ञात चोराने फोडले परंतु आजुबाजुच्या नागरीकांना जाग आल्याने एटीएम मशिन पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या चोरांनी एटीएम तेथेच टाकून पोबारा केला. ही घटना बुधवारी (दि.11) पहाटेच्या दरम्यान घडली.


याबाबतची माहिती अशी की, पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून आलेल्या चोरांनी संकल्प अपार्टमेंट मधील एटीएमचा दरवाजा तोडून आज प्रवेश केला. आतील एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना मशिन फोडता आले नाही म्हणून त्यांनी एटीएम मशिनला साखळी बांधून स्कार्पिओ गाडीच्या सहाय्याने एटीएम सेंटर उखडून काढले. यावेळी झालेल्या आवाजाने अपार्टमेंमधील लोकांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post