अहमदनगर शहर सहकारी बँकच्या कर्मचारी संचालकपदी संतोष मखरे!


नगर, (दि.18 नोव्हेंबर) : अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लाईज युनियन तर्फे संतोष मखरे यांची अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी संतोष मखरे यांच्या नियुक्तीचे पत्र बँकेस दिले.


मखरे यांच्या नियुक्तीचे युनियन कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे, जनरल सेक्रेटरी मधुकर खेडकर, जॉइन्ट सेक्रेटरी नितिन भंडारी, खजिनदार एम.वाय. कुलकर्णी आदिनी अभिनंदन केले आहे. मखरे यांच्या नियुक्तीने सेवक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post