नगर, (दि.17 नोव्हेंबर) : अकोळनेर येथे राहणारे तात्याबा यादव जाधव यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करुन उचकापाचक करुन घरातील सुमारे 52 हजार रुपयांच्या वस्तुंवर डल्ला मारला आहे.
माहिती अशी की, तात्याबा यादव जाधव (वय 56, रा.अकोळनेर, ता.जि.नगर) हे दि.15 नोव्हेंबर रोजी बनपिंप्री येथे नातेवाईक अरुण काशिनाथ पठारे यांच्याकडे राहिले असता.
जाधव यांच्या घराचा कडी - कोयंडा, कुलुप तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम, टिव्ही, मोबाईल असा एकुण 52 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे.
जाधव यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली असून पुढील तपस पोहेकॉ पठाण करीत आहे.
