पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले

नगर, (दि.09 नोव्हेंबर) : दोन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला थांबवून त्यांच्या हातातील 2 लाख 70 हजार रुपय लुटण्याची घटना गुरुवारी दि.5 रोजी सायंकाळी माळीवाडा परिसरात घडली आहे.


याबाबतीची माहिती अशी की, प्रसन्नाकुमार नयनसुखलाला नहार (वय 65, रा. कोहिनूर गार्डन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, माळीवाडा) यांनी बँकेमधून काढलेली 2 लाख 70 हजार रुपयांची रोकड घेवून घरी जात असताना घराजवळ 2 अनोळखी इसमांनी त्यांना विचारणा केली की, हमें कृष्णा अपार्टमेंट में जाना है. रस्ता बोलो, यावर पत्ता सांगण्यासाठी नहार यांचे लक्ष विचलीत होताच.


अनोळखी इसमांनी त्यांच्या हातामधील 2 लाख 70 हजार रुपये असेलेली बॅग हिसकावून चोरुन नेली. याप्रकरणी प्रसन्नाकुमार नहार यांनी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत भंगाळे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post