बोधेगाव परिसरातील कलाकारांचा लघुचित्रपट "शेतकर्‍यांचा आधार"आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड


नगर - बोधेगाव, (दि.06 ऑक्टोबर) : बोधेगाव परिसरातील कलाकारांच्या भुमिका असणारा लघुपट "शेतकर्‍यांचा आधार" या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.


नुकत्याच औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या रोशनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये, (२०२०)मधे शेतकर्‍यांच्या जीवनावर आधारीत लघुचित्रपट "शेतकर्‍यांचा आधार" हया लघुचित्रपटाची जगभरातून आलेल्या साडेसहाशे लघुचित्रपटा मधुन आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.

 

या अगोदर पुणे येथे प्रहार चित्रपट मोहोत्सवात या लघुचित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट म्हणून प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा, कथा लेखक किशोर आंगरख यांनी स्पष्ट मांडल्या आहेत, 

 

या लघुपटाचे निर्माते कुमार मुंढे व विनोद आंगरख यांनी त्यांची बाजू चोख संभाळी आहे.या लघुपटात महत्वाच्या भूमिकेत शेतकर्‍यांचे नेते आमदार  बच्चूभाऊ कडु यांचे सोबत बोधेगाव परिसरातील दिलीप अंगरख, पुजा कसबे, विकास आंगरख, सर्जेराव कसबे (कसबे पेंटर कोनोशीकर), अशोक गजभिव, कुमार मुंढे, लखन आंगरख, असिफ शेख, कॅमेरामन आविनाश गजभिव, अशा अनेक कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे, 

 

सर्व कलाकार बोधेगाव परिसरातील पिंगेवाडी, कोणोशी या खेड्यातील आहेत तर काही कलाकार पैठण तालूक्यातील आहेत. या कलाकारांचे विघ्ण हर्ता, रेडू,टकाटक, आणी इभ्रत या चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे, संगीतकार बबन आडागळे, सैराट फेम आभिनेते सुरेश विश्वकर्मा, फँड्री फेम अभिनेते राहुल बेलापुरकर यांनी आभिनंदन केले आहे. तर या कलाकारांवर जिल्हया मधुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post