वयोवृध्दांना मारहाण करुन सोन्या चांदीचे दागिन्यासह रोख रक्कम लांबवली


नगर, (दि.08 ऑक्टोबर) : पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथील घाटवाडीत चोरट्यांनी वयोवृध्द पती पत्नीला मारहाण करुन घरातील सुमारे 1 लाख 7 हजाराचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेली आहे.


माहिती अशी की, फिर्यादी यशोदा एकनाथ कांडेकर (वय 70,रा.घाटवाडी, नारायण गव्हाण, ता.पारनेर)  येथील घराच्या पडवीमध्ये झोपले असताना चार अज्ञात चोरट्यांनी येवून त्यांच्या पतीला  मारहाण  करुन  दुखापत  केली.


तसेच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील व कानातील तसेच पायातील सोन्याचे दागिने यामध्ये मनीमंगळसुत्र, चांदीचे जोडवे, सोन्याचे कानातील तसेच रोख रक्कम 30 हजार 500 रुपये असा बळजबरीने चोरुन नेला असल्याचे सौ.कांडेकर यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.

 

सौ.कांडेकर यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई कोसे करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post