डॉ.वसंतराव गोसावी संगीत विद्यालयाचा 100 टक्के निकाल

नगर, (दि.08 ऑक्टोबर) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने नोव्हेबर-डिसेंबर मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये मार्केट यार्ड, नगर येथील डॉ.वसंतराव गोसावी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी  केल्याने विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला.

 

यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे - प्रारंभिक (गायन) विशेष योग्यता - सार्थक निक्रड, सई करांडे, वैदेही पवार, बापू बडे, कृष्णा बडे, योगेश कोथिंबीरे, विश्‍वासराव कांबळे, प्रार्थी ठोंबरे, राहुल बारवेकर, प्राप्ती ठोंबरे. प्रारंभिक परिक्षेतील प्रथम विद्यार्थी - प्रशांत बंडगर, ओम गिते. प्रवेशिका प्रथम विशेष योग्यता- धनेश वाघमारे, लुंबिानी चव्हाण, सृष्टी बोर्‍हाडे, साक्षी बोर्‍हाडे, रोहित सरोदे, सुमित मते, दादासाहेब गांगर्डे, मंगल मोढवे. प्रवेशिका प्रथम (गायन) प्रथम श्रेणी- प्रेमराज सोनवणे, सतीश मुरलीधर आहिरे, जनार्दन शिंदे.


प्रवेशिका पूर्ण (गायन) विशेष योग्यता विद्यार्थी - श्रीकांत बोरुडे, वैशाली घोडेस्वार, किरण काळे, शिवाजी काळे, गौरी शेळके, शुभम शेरकर. प्रवेशिका पूर्ण (गायन) प्रथम श्रेणी - प्राजक्ता डांगे, केशव तांबिले, वेदांत साबळे. मध्यमा पूर्ण (गायन) प्रथम श्रेणीत - राहुल भुजबळ, सूर्यकांत पुंडे. विशारद पूर्ण (गायन) प्रथम श्रेणी- सुनिल पारे, संतोष मंडलकर.
 

वरील सर्व विद्यार्थ्यांना  प.पु. गुरुवर्य प्रा.आर.एन.भनगडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ.वसंतराव गोसावी, सहव्यवस्थापक प्रा.गायकवाड आदिंनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post