लॅपटॉप,मोबाईल चोरीला


नगर, (दि.27 ऑक्टोबर) : घरात ठेवलेला 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 8 हजार रुपये किंमतीचा ओप्पो मोबाईल असा 38 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरांनी चोरुन नेला.


ही घटना झारेकरगल्ली येथे शुक्रवारी (दि.23) सकाळी घडली. या प्रकरणी वृषाली सोमनाथ लोंढे (वय 40, रा.झारेकरगल्ली) यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नेांद केली असून अधिक तपास पोलिस नाईक दुधाळे हे करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post