नगर, (दि.27 ऑक्टोबर) : घराच्या मुख्य दरवाजाचे कलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत घरातील 500 रुपये चोरुन नेले. ही घटना पाईपलाईन रोडवरील गावडेमळा येथे शुक्रवार (दि.23) रोजी घडली आहे.
येथील रहिवासी राजेंद्र गुलाबराव वाबळे (वय 56, राहणार गावडेमळा, पाईपलाईन रोड,नगर) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली.
घरातील 150 रुपये व पॅन्टच्या खिशातील 350 रुपये चोरुन नेले.या प्रकरणी राजेंद्र वाबळे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
