नगर ,दि.26 (प्रतिनिधी) : लघुशंकेसाठी थांबलेल्या मालट्रक चालकाला चाकूचा धाकू दाखवून 25 हजार रूपयाला लुटल्याची घटना नगर- औरंगाबाद रोडवरील गजराजनगर येथे भरदुपारी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, ट्रक चालक तुकाराम महादेव झिरपे (वय- 38 रा. कोळगाव ता. शेवगाव) हे मालट्रक घेऊन नगर- औरंगाबाद रोडने चालले होते. त्यांनी गजराजनगर येथे लघुशंकेसाठी मालट्रक उभा केला. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांमधील एकाने यांना चाकूचा धाक दाखविला. झिरपे यांच्या खिशातील 25 हजारांची रोख रक्कम काढून घेत पळ काढला.
झिरपेंच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर करीत आहे.
