राज्य शिखर बँक घोटाळा : अजित पवारांसह ६९ जणांना ‘क्लीन चीट’


मुंबई,  (दि.08 ऑक्टोबर) : महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेतील २५  हजाराच्या कथित घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयात मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला असून, यामध्ये अजित पवारांसह ६९ जणांना क्लीनचिट मिळाली आहे.
 

तत्कालिन संचालक मंडळावरच 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने तत्कालिन संचालक मंडळ 2011 मध्ये बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे होती.

अजित पवार यांच्यासह 70 जणांवर सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपत असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांची नावे होती.

Post a Comment

Previous Post Next Post