नाशिक, (दि.08 सप्टेंबर) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल एका वृत्तवाहिनीवर बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत सकल मराठा क्रांती मोर्च्याने त्यांचा निषेध केला होता. यासाठी सकल मराठा समाज आणि करण गायकर यांनी गुन्हा दाखल केला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, तुषार गवळी, चेतन शेलार, तुषार जगताप, गणेश कदम, अस्मिता देशमाने, माधुरी पाटील यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, उत्तरेश्वर पेठ तरुण मंडळाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चप्पल मारुन निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.
Tags:
Maharashtra
