युवकांना स्वावलंबी होण्यासाठी भरीव मदत करणार : नरेंद्र पाटील

नगर, (दि.01 ऑक्टोबर) : विकासातून व सामाजिक प्रश्नातून आ. संग्राम जगताप यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला. तरुण वयातच सामाजिक जाणिवेची भान बाळगून समाजाच्या सुख-दुःखात सामील झाले. आपल्यावर आलेल्या कोरोना संसर्ग विषाणूच्या महामारीत त्यांनी मोलाची कामगिरी करुन एक प्रकारे जनतेशी नाळ जोडणारे आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. राज्यातील युवकांना स्वावलंबी करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून पुढील काळात भरीव मदत केली जाईल, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा नगर शहराच्यावतीने सत्कार करताना आ. संग्राम जगताप, मा. जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापत अभिलाष घिगे, विठ्ठल गुंजाळ, संदीप बोदगे, बाळासाहेब जगताप, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, संभाजी पवार, मयूर कुलथे, धनंजय गाडे, प्रसाद डोके, विरेंद्रसागर गुंजाळ, अंकुश मोहिते आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, नगर शहरातील युवकांसाठी व्यवसायाच्या उभारणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्यावतीने मदत करावी. त्या माध्यमातून युवक स्वावलंबी होऊन व्यावसायिक व उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार होतील. यासाठी महामंडळाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात आर्थिक सहाय्य करावे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post