विवाहनोंदणी वेबसाइटवरून फसवणुक करणारा भामटा गजाआड : सायबर पोलिसांची कारवाई



नगर, (दि.04 ऑक्टोबर) :  जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून संपर्क साधून फसवणुकीने लग्न करुन, ईमेलवरून धमकीचे मेल पाठविले तसेच अनेक मुलींना वेबसाईटच्या माध्यमातून रिलेशनशिप मध्ये राहून फसविणार्‍यास अहमदनगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे.


अटक केलेल्या व्यक्तीने त्यांचे नांव कुणाल नंदकुमार जगताप (वय 37, राहणार घर नंबर 6 द्वारकाधीश हौसिंग सोसायटी, काटेगल्ली, त्रिकोणी गार्डनजवळ, द्वारका, नाशिक) असे सांगितले आहे.


माहिती अशी की,’जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून संपर्क करून माझ्याशी फसवणुकीने लग्न केले. ई-मेलवरून धमकी देणारे मेल पाठवले. अनेक मुलींना वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क साधून रिलेशनशिपमध्ये राहून त्यांना फसविले असल्याच्या एका मुलीच्या फिर्यादीवरुन सायबर पोलीस ठाण्यात भादवि कलम 417, 420 आयटी अ‍ॅक्ट 2000 चे कलम 66 (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


या दाखल गुन्ह्याचा सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला. या दरम्यान आरोपी हा इंजिनिअर असल्याने त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असल्याने तो सापडत नव्हता. त्याच्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली असता, तो नाशिक, बैंगलोर (राज्य कर्नाटक), पोंडीचेरी (राज्य तामिळनाडू) याठिकाणी आरोपीपर्यंत पोहचण्यात अडथळे येत होते. आरोपी शोधकामी तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी हा बैंगलोर येथे असल्याचे निष्पन्न झाले.


बैंगलोर (राज्य कर्नाटक) येथे जाऊन कर्नाटक पोलिसांच्या मदतीने सापळा लावून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोनिअरुण परदेशी, पोउनि प्रतीक कोळी, पोना विशाल अमृते पोकॉ अभिजीत अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post