भारतीय राज्य घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत 36 व्या क्रमांकावर असलेले धनगर हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्त ऐवजातून सिद्ध झाले आहे. व ते सर्व राज्य कर्त्यानी मान्य केलेले आहे. परंतु केवळ राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या 25 वर्षांपासून धनगर समाज आरक्षणपासून वंचित आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 25 वर्षांपासून धनगर समाजाच्या विविध संघटना लोकशाही मार्गाने आंदोलने करून राज्य शासनाचे लक्ष वेधत आहेत. परंतु महाराष्ट्र शासन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे जाणीवूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ही दीड कोटी धनगर समाजाची फसवणूक आहे. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आता गप्प बसणार नसल्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
भातकुडगाव मंडलाधिकारी अप्पासाहेब शिंदे, कामगार तलाठी प्रदीप मगर, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनापर्यंत कळविण्यात येतील असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात जय मल्हार सेनेचे प्रदीपराज भोंडे, काशीनाथ आरगडे, सोपानराव कांदळकर, गंगाधर साळवे, बाळासाहेब घोडे, संतोष कांदळकर, दत्तात्रय वीर, रासपचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर, अरुण कर्डिले, अशोक पाचे, तुकाराम काळे, अशोक लांडे, दशरथ मिसाळ, दत्तात्रय गाडे, आप्पासाहेब क्षिरसागर, संतोष वारे, दत्तात्रय काळे, बाबासाहेब पाचे, काशिनाथ पाचे, आत्माराम पुंडक, हरी कर्डिले, सचिन काळे, संजय वारे, शिवाजी मतकर, श्रीहरी वारे, सतीश हुलणे, जालिंदर देशमुख, अशोक कोल्हे, कडूबाळ क्षिरसागर यांच्या सह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
