नगर, (दि.22 ऑक्टोबर) : प्रभारी पोलीस अधीक्षक नगर डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदा कल्याण मटका चालवणार्यांवर कारवाई केली आहे.
याप्रकरणी सुभाष वामन थोरात (वय 40 वर्षे रा. रेणुका नगर अहमदनगर), प्रशांत सुरेश झावरे (वय 30 वर्षे रा. साईनगर बोल्हेगाव),(मालक)- बजरंग मामा (फरार) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कडून 11हजार 270/- रु. रोख मिळुण आले आहे.
विशेष पथकातील पोसई एस. एच. सुर्यवंशी, पोना. अरविंद भिंगारदिवे, पोकॉ. राजु चव्हान, पोकॉ. संभाजी घोडे, पोकॉ. विनोद पवार, पोकॉ.दिलीप गायकवाड यांनी ही कारवाई केली.
विशेष पथकाने आणखी एका छाप्यात नदिम इब्राहिम शेख( वय 35 वर्षे रा. जिल्हा परीषदशाळेसमोर, सह्याद्री चौक, एमआयडीसी. अहमदनगर ), मालक. - निलेश भाकरे (फरार) यांच्या वरही मटका प्रकरणी कारवाई केली. त्यांच्या कडून 1,420/- रु. रोख मिळुण आले आहे.
