कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट


मुंबई,  (दि.27 ऑक्टोबर): राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दरांमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे.  प्रति तपासणी 200 रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरांनुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. 

 

यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतकेकमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

 

सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट आणत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post