नगर, (दि.02 ऑक्टोबर) : उत्तरप्रदेशमधील बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जाणार्या राहुल गांधींना पोलिसांनी रस्त्यामध्येच अडवले. तसेच पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहे. याच पार्श्ववभूमीवर काँग्रेसच्या वतीने नगरमध्ये देखील योगी सरकारचा निषेधार्थ रास्तारोको केला.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून, रस्ता रोको आंदोलन करणार्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिप चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आजू शेख, सोनू शेख, मोबीन शेख, गणेश आपरे, शरीफ सय्यद यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकार आणि योगी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
