शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू


नगर, (दि.02 ऑक्टोबर) :  पारनेर येथील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या राहुल रामदास जवक या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा सोमवारी सकाळी बुडून मृत्यू झाला. 

 

त्याला वाचवण्यासाठी गेलेली आई, तसेच चुलत भाऊ ॠतिक हे देखील नाकातोंंडात पाणी गेल्यामुळे बेशुद्ध पडले होते. आईच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ॠतिक अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याचे राहुलचे वडील रामदास जवक यांनी सांगितले.

 

माहिती अशी की, राहुल व त्याचा चुलत भाऊ पोहण्यासाठी गेले होते. राहूल शेततळ्याच्या दुसर्‍या टोकाकडे गेला. परतताना त्यास दम लागला. ॠतिक मदतीला गेला. राहुलच्या आईनेही पाण्यात उडी घेतली. घाबरलेल्या राहुलने ॠतिकसह आईलाही मिठी मारली. तिघेही बुडू लागले. 

 

लोकांनी राहुलची आई, ॠतिकला बाहेर काढले. राहुलचा शोध घेण्यात अडचणी येऊ लागल्या. वर काढेपर्यंत तो गतप्राण झाला होता. 

 

सध्या सर्वत्र पाणी चांगले असल्याने पोहण्याचा सराव सर्वत्र करताना तरूण दिसत आहेत. मात्र गाळ जास्त असलेल्या ठिकाणी पोहण्यासाठी जावू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post