भविष्य निधि पेंशन धारकाना हयातीचा दाखला नुतनीकरण करण्यासाठी अवाहन


 

नगर, दि.31 (प्रतिनिधी) :  अहमदनगर येथील कर्मचारी भविष्य निधिसंगठन (ई.पी.एफ.ओ.) तर्फे सर्व सदस्य, विधवा / विधुर, पेंशन धारकांना, दरवर्षाप्रमाणे 01 नोव्हेंबर 2020 पासून आपला हयातीचा  दाखला (Digital Life Certificate) संगणकिय पध्दतीने बनविण्याचे अवाहन केले जात आहे. 

 

हयातीचा दाखला बनविण्यासाठी पेंशन धारकांचे आधार कार्ड, मोबाईल, पी.पी.ओ. नंबर आणि पेंशन  बँक पासबुक सह आपल्या पेंशन वितरित करणा-या बैंकमध्ये “डिजिटल जीवन प्रमाणपत्र” तयार करुन घ्यावे किंवा आपल्या जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्रामध्ये (CSC) आपले जीवन प्रमाणपत्र संगणकिय पध्दतीने तयार करावे. 

 

(जीवन प्रमाणपत्र  बनविण्याची माहिती खाली दिलेली आहे) जेणे करून आपली पेंशन सुरळीत पणे मिळण्यास अडचण येणार नाही . जीवन प्रमाण पत्राची वैधता जीवनप्रमाणपत्र बनविण्यच्या तारखे पासून एक वर्षाची असेल. कर्मचारी भविष्य निधि संगठन (ई.पी.एफ.ओ.) क्षेत्रिय कार्यालय नाशिकच्या पेंशन धारकांनी पी.पी.ओ. नंबर संगणकामध्ये खाली दिलेल्या पध्दतीप्रमाणे टाकावे. KDNSK00XXXXXX किंवा KDNSK000XXXXX  या पध्दतीने भरावे.


कोविड -१९ साथीचा रोगापासून बचाव करण्यासाठी  शरीरिक  अंतर, फेस मास्कचा वापर आणि शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्य करा. असे अवाहन अभिषेक कुमार मिश्र, सहायक भविष्य निधि आयुक्त, जिल्हा कार्यालय, अहमदनगर यांनी केले आहे. तरी सर्व पेंशन धारकानी याची नोंद घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post