नगर तालुका काँग्रेस एक लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देणार : शेळके


नगर, दि.31 (प्रतिनिधी) : शेतकरी विरोधी काळे विधेयक  भारतीय  जनता पक्षाच्या सरकारने संसदेत  मंजूर  करून घेतली आहे. या नवीन कायद्यामुळे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.  कामगार  देशोधडीला  लागणार  आहे.  हा कायदा रद्द करावा यासाठी एक लाख सह्याचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी म्हंटले आहे.


शेतकरी  आणि  कामगारांना  न्याय  मिळवून  देण्यासाठी,  तसेच  भाजप सरकारने लादलेले विधेयक रद्द करण्यासाठी देश पातळीवरील अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नेतृत्वाखाली  व  काँग्रेस  पक्षाचे नेते खा. राहुलजी गांधी यांचे मार्गदर्शनाखाली देशातील शेतकर्‍यांच्या  सह्यांचे  निवेदन  देशाचे  राष्ट्रपती  यांना  देण्यात  येणार  आहे.


त्याचाच भाग म्हणून नगर तालुका काँग्रेसच्या वतीने बाबुर्डी घुमट देऊळगाव सिद्धी वडगाव तांदळी येथून सह्यांच्या मोहिमेत सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी या काळ्या विधेयकाच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर, कामगार रस्त्यावर येऊन त्याला विरोध करत असताना हे सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून नगर तालुक्यातून एक लाख शेतकरी व कामगारांच्या सह्यांचे निवेदन देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post