नगर, (दि.21 ऑक्टोबर) : कोरोना वैश्विक महामारीच्या या संकट काळात अनेक विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले. हे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी माजी महापौर भगवान फुलसौंदर मित्रमंडळाच्या वतीने प्रार्थना करण्यात येणार आहे, याबरोबरच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिर गुरुवारी (22 ऑक्टोबर) सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होईल. नक्षत्र लॉन येथे होणार आहे. सद्य परिस्थितीत रक्ताची गरज वाढते आहे.
त्या तुलनेत रक्तपुरवठा कमी आहे. रक्ताची गरज पूर्ण व्हावी, हे विचारात घेऊन नगर शहर शिवसेना, नक्षत्र प्राणायाम ग्रुप, मोरया ग्रुप, संकल्प ग्रुप, साई सिंडिकेट, फुलसौंदर मळा व विनायकनगर मित्र परिवार यांच्या वतीने हे शिबिर आयोजित केले आहे.
Tags:
Ahmednagar
