राज्य सरकारला शेतकर्‍यांच्या हितापेक्षा कार्यकर्त्यांची काळजी : प्रा.भानुदास बेरड

भाजप किसान मोर्चाच्यावतीने पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

नगर, (दि.17 ऑक्टोबर) : केंद्र  सरकारने  कृषी विधायक मंजूर करुन  लागू  करण्याचा  निर्णय घेतला आहे.  हे शेतकर्‍यांच्या हिताचाच असून, त्यामुळे शेतकर्‍यांवर विविध कर व बंधने होती ती बंधने मुक्त झाली आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांना आपला शेतमाल कोठेही व आपल्या किंमतीनुसार विकता येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मुक्त बाजारपेठ दिल्याने शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळेल  आणि  त्यातून  शेतकर्‍यांची  उन्नत्ती  होईल.  

 

हा या विधेयकामागील उद्देश आहे. परंतु राज्य सरकारला शेतकर्‍यांच्या हितापेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांची काळजी असल्याने या विधेयकाला विरोध करत आहेत. याबाबत भारतीय जनता पार्टीच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. किसन मोर्चाच्यावतीने विधेयक शेतकर्‍यांना समजवून सांगावे. केंद्र सरकारच्यावतीन शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती  शेतकर्‍यांपर्यंत  पोहचवावी, असे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांनी केले.

 

भाजप  किसान  मोर्चाच्यावतीने  पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा .भानुदास बेरड यांच्या हस्ते  देण्यात  आले.  याप्रसंगी  किसन  मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कचरु चोथे, रमेश पिंपळे,  मनोज  कोकाटे,  अनिल  लांडगे,  सुनिल यादव, अंबादास ढाकणे, राजेंद्र बनसोडे, संजय टाकळकर, गणेश जायभाय, एकनाथ खोसे आदि उपस्थित होते.


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष  कचरु  चोथे  म्हणाले,  केंद्रातील  मोदी सरकारने नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यासाठीच नवीन कृषी विधयक आणून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढून त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळावा, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही. या विधेयकाबाबत किसन मोर्चा जिल्हाभर जागृती करणार आहे. किसन मोर्चाचे नूतन पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवतील, असे सांगून पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई मिळण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी नुतन पदाधिकार्‍यांचे किसन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, खा.डॉ.सुजय विखे आदिंनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post