सरकारला 31 ऑक्टोबरचा अल्टिमेटम
पुणे, (दि.03 ऑक्टोबर) : मराठा आरक्षणाचा पेच तसेच इतर समस्यासंदर्भात विविध संघटना तसेच नेत्यांमध्ये एकवाक्यात आणण्यासाठी पुण्यात आमदार विनायक मेटे यांनी पुढाकार घेत मराठा विचार मंथन परिषद आयोजित केली होती.
या बैठकीत एकूण 25 ठराव करण्यात आले. या ठरावांची अंमलबजावणी 31 ऑक्टोबर पर्यत सरकारने करावी, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली. राज्यातील विविध भागातील प्रतिनिधी पुण्यामधील बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. बैठकीत एकूण 25 ठराव करण्यात आल्याची माहिती देताना या ठरावांची अंमलबजावणी 31 ऑक्टोबर पर्यंत सरकारने करावी, अन्यथा समाज रस्त्यावर उतरला तर परिणामांची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही मेटे यांनी दिला.
Tags:
Maharashtra
