नगर, (दि.18 ऑक्टोबर) : कोपरगांव येथील मेनरोडवरील दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दुकानांचे शटर तोडून मोबाईल टॅबसह 1 लाख 45 हजार 600 रुपयांची चोरी केली आहे. या घटना गुरुवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील प्रकाश एजन्सी या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील 10 हजार रुपये किंमतीच्या मोबाईल टॅबची चोरी झाली आहे, तर सप्तर्षी मळा येथील साई समृद्धी मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून आतील 1 लाख 35 हजार 600 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
याप्रकरणी हरेश मोहनदास कराचीवाला (रा.श्रीराम मंदिररोड, कोपरगाव) व समृद्धी मेडिकलचे संजय शंकर वाणी (रा. सप्तर्षी मळा, कोपरगाव) या दोघांच्या फिर्यादीवरुन किसन लडकिया बारेला (वय 20, अडावद, ता. यावल, जि. जळगाव) व राजेश चांदीया बारेला (वय 30, रा. वैजापूर, मध्यप्रदेश) तसेच गुड्डू यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
