‘आम्हाला तुमचा अभिमान’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

राष्ट्रपती पदक, शौर्य, प्रशंसनीय सेवा पदक जाहीर
 
 
मुंबई  (दि.14 ऑगस्ट ) :  ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
 
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे नमूद केले आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post