डॉक्टरांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, सध्या कोरोनासोबतची लढाई सर्वस्तरातून लढली जात आहे. त्यात आपल्या सर्व डॉक्टरांचा सिंहाचा वाटा आहे. पण या काळात याच्या झळा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहेत. 3-4 महिने पैसे हातात नाही. अशा परिस्थितीत कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांचे देखील उपचार होत आहेत या भयावह परिस्थितीत आपण छोट्या- मोठ्या क्लिनिक, दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहात. या परिस्थितीमध्ये रुग्ण तपासणी शुल्कात सर्वच डॉक्टरांनी वाढ केल्याने नाराजी आहे.
काही डॉक्टरांनी 100 रुपये 150 ते 200 तर काहींनी 300 चे 500 रुपये शुल्क केले आहे.सर्वसामान्यांना या शुल्क वाढीमुळे आर्थिक फटका बसत आहे. लहान मुलांचे दवाखाने, दातांचे दवाखाने, सर्दी, ताप, कान घसा डॉक्टर लहान मोठे क्लिनिक यांनी शुल्क वाढ करुन सर्वसामान्यांचे पाय आणखी खोलात टाकू नये. डॉक्टरांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप आदपूर्वक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. मनसेची कोणतेही आंदोलन, निदर्शने करण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगर (दि. 14 ऑगस्ट ) : सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत शहरातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी फी दुप्पट, तिप्पट केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांचे तपासणी शुल्क कमी करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar
