शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचे महत्व समजणे गरजेचे : आकाश आगरकर

नगर (दि.12 ऑगस्ट ) : येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये क्रांतीदिन व गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने  अ‍ॅड.शिवाजीराव निमसे, खा.सुजय विखे यांचे वैयक्तीक सहाय्यक आकाश आगरकर, सहसेक्रेटरी सुनील रूणवाल, प्राचार्य सुनिल पंडित, प्राथमिक विभागाच्या  मुख्याध्यापिका  सौ.प्रतिभा धरम, पत्रकार मिलिंद चवंडके, मार्कंडेय विद्यालयाचे प्राचार्य दीपक रामदिन, हरियालीचे सुरेश खामकर, सौ.तारा रासकर, प्रा.अनिल आचार्य, अविनाश जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी  आकाश आगरकर म्हणाले, शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेली अशी ही संस्था आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचे महत्व समजणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. त्यांच्या कार्यात आम्हीही सहभागी होऊन सर्वोतोपरि मदत करु, असे सांगितले.

प्राचार्य सुनील पंडित म्हणाले, संस्थेच्यावतीने नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. आज वृक्षारोपणाचे महत्व सर्वांनाच पटले आहे. प्रत्येकाने या कार्यात सहभागी झाले पाहिजे.  आज लावण्यात आलेली वृक्ष भविष्यात मोठ्या डौलदारपणे उभी राहतील व परिसर बहरुन येईल.

याप्रसंगी विद्यालयाच्या परिसरातील ऐतिहासिक आशा गांधी मैदानामध्ये अक्षयवृक्ष, कल्पवृक्ष, पिंपळ, कडुलिंब, सीताफळ, रामफळ, करंज, सप्तपर्णी, कन्हेर, बहावा, लक्ष्मीतरु, दुरांडा आदी औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास लक्ष्मण लुहान, साई चवंडके, सौ. सुमन राऊत, सूर्यकांत रासकर, रवी केळगंद्रे, आदी उपस्थित होते. सर्वांचे मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा धरम यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post