पोषण आहार बनविण्यासह इतर कामे करणार्या
महिलांना दिवसाला 50 रुपये अत्यल्प मानधन्
महाराष्ट्रात सन 2003 पासून जिल्हा परिषद शाळामध्ये मध्यान भोजन म्हणून शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो. हा आहार शिजवण्याचे काम आर्थिक दुर्बल घटकातील महिला करतात. परंतु शासन त्यांना फक्त दररोज 50 रुपये एवढे अत्यल्प मानधन देते. त्यामध्ये शालेय पोषण आहार शिजवणे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे, पोषण आहाराची भांडी घासणे इत्यादी कामे या महिला करत असतात.
त्यांना शासन अतिशय कमी मानधन देत असून, या कामासाठी महिलांना पाच तास काम करावे लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शालेय पोषण आहार शिजविणार्या महिलांना अल्पभूधारक मध्ये समावेश करून त्यांना घरकुल मंजूर करण्यात यावे, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना किमान 6 हजार रुपये मानधन देण्याची मागणी मनसेचे नगर तालुकाध्यक्ष ढवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
