कंटेनरची धडक बसून दूध उत्पादकाचा मृत्यू

 
भाळवणी (दि.13 ऑगस्ट ) : पारनेर तालुक्यातील वडगाव आमली येथील दूध उत्पादक शेतकरी संदीप अप्पासाहेब डेरे यांचे बुधवारी दुपारी अपघाती निधन झाले. कल्याण - विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर पारस पाइप कंपनीसमोर कंटेनरने (एमएच ४६ बीएफ ७६३७) वळण्यासाठी ब्रेक दाबल्याने पाठीमागून भाळवणीकडे येत असलेल्या मोटारसायकलीची (एमएच १६ एए. ८८४९) धडक बसून संदीप डेरे (४५) व मुलगी सानिका (१७) जखमी झाले. 
 
त्यांना तातडीने नगर येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच डेरे यांचे निधन झाले. सानिकावर उपचार सुरू आहेत. संदीप डेरे यांच्या संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह अ‍ॅम्ब्युलन्स पारस कंपनीच्या गेटसमोर आणून उभी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 
 
आमदार नीलेश लंके यांनी घटनास्थळी येत कंपनी प्रशासनाशी बोलणी केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post