आयक्यू स्कॉलरशीप परीक्षेतजय गांधी भारतात तिसरा


नगर, (दि.11 जून) :इन्स्टिट्युट फॉर इल्युमिनेशन ऑफ इंटेलिजन्स कोशंट एलएलपी यांच्या वतीने सन २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या आयक्यू ऑल इंडिया ओपन इंटेलिजन्स स्कॉलरशीप परीक्षेत येथील जय संजय गांधी याने यश संपादन केले. तो भारतात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. ९३.३३ टक्के गुण मिळवत त्याने तिसरी रँक संपादित केली.

जय हा अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिक्षण घेत आहे. जय याला मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, सुनील जोर्वेकर, आई जयश्री गांधी व वडील संजय यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे राजेश गुंदेचा, अजित गुंदेचा यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post