प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांची माहिती
औरंगाबाद, (दि.10 जून) : राष्ट्रीय जनगणना २०२० - २१ ला सुरुवात झाली असून त्यामध्ये सर्वच जातीची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर व कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीत निर्णय झाला असल्याचे डॉ.भानुसे यांनी सांगितले आहे.
भारतदेश, विविध भाषा, परंपरा, रूढी, जातीनी एकरूप असणारा देश आहे, त्यामुळेच राष्ट्रीय जनगणना होणे हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे. त्यात किती पुरुष, किती महिला, तसेच जातनिहाय माहिती. आर्थिक परिस्थिती याची योग्य ती माहीत मिळते. परंतू २०२० - २१ च्या होत असलेल्या जनगणनेत एस.सी.एस.टी. प्रमाणे ओ.बी.सि., एस.ई.बी.सी. व इतर सर्व प्रवर्गाची देखील जातनिहाय जनगणना होणे गरजेची आहे. परंतु तसे पर्याय दिसत नाहीत. जर अशी जनगणना झाली तर प्रत्येकाची लोकसंख्या किती हे कळेल, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. (प्रतिनिधित्व) नॉन क्रिमिलेअर अट.पदोन्नती मध्ये आरक्षण.हे स्पस्ट होईल. खरे चित्र समोर येईल. लोकसंख्येनुसार आर्थिक तरतूद केली जाते. त्यामुळे जातिनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे.
जातिनिहाय जनगणना नसल्यामुळे ओ.बी.सी. व इतर घटकांसाठी तरतुदी करता येत नाही असे नीती आयोगाचे म्हणणे आहे तर, नेहमी सुप्रीम कोर्ट व हाय कोर्ट ओबीसी बाबत व इतर निकाल देताना वारंवार लोकसंख्या माहीत नसल्याचे कारण सांगून विशेष निर्णय देत नाही. व नियोजन आयोग सुध्दा अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी ओबीसीची व इतर घटकाची अधिकृत लोकसंख्या मागते. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली तरच हे प्रश्न सुटतील.
जर जातीनिहाय जनगणना झाली नाही तर, संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना जनगणनेवर बहिष्कार टाकतील व तीव्र जनआंदोलन करतील. असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
Tags:
Maharashtra
