स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर, (दि.09 जून) : विविध भागात रात्री घरात घुसून चोर्या करणारे चोरटे मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये संदेश उर्फ काळ्या ताज्या भोसले (वय 20, रा.सैनिकी नगर, भिंगार, नगर), रुपेश ताज्या भोसले (वय 21, रा.सैनिकनगर, भिंगार) असे ताब्यात घेतलेल्यांचे नांवे आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुरु असताना हा गुन्हा संदेश उर्फ काळ्या ताज्या भोसले, रुपेश ताज्या भोसले (दोघेही राहणार सैनिकनगर, भिंगार) या दोघांनी केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून चोरट्याचा पाठलाग करून सैनिकनगर (भिंगार) येथे पकडले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता, सदरचा गुन्हा हा साथीदार शरम्या हुरमाशा काळे (रा.अकोळनेर ता.नगर), काळ्या हुरमाशा काळे आम्ही मिळून केल्याची कबुली दिली आहे. यावेळी आरोपीकडून 4 हजार रुपयाचा रेड मी कंपनीचा व 6 हजार रु.चा ओपो कंपनीचा मोबाइल काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले.
दरम्यान, आरोपींनी मार्च महिन्यात मुकुंदनगर येथे व मे महिन्यात नामदेव चौक, सावेडी, अहमदनगर येथील दुकानातून रोख रक्कमेची चोरी केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, पोहेकाँ सुनील चव्हाण, दत्ता हींगडे, पोना भागीनाथ पंचमुख, आण्णा पवार, रविंद्र कर्डिले, दीपक शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकाँ योगेश सातपुते, सागर सुलाने, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:
Crime