तपासणी न करताच बाहेरून आलेल्या लोकामुळेच जिल्हयात घुसलाय कोरोना ..

नमस्कार मित्रांनो,  

जगभरात सध्या कोरोनाचा व्हायरस धुमाकूळ घालतोय. कोरोना हा संसर्गजन्य विकार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना ग्रस्तांची संख्या मुंबई आणि पुणे शहरात वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने परराज्यातील लोकांना घरी पोहचण्यासाठी व्यवस्था केली आहे. काही लोक पायी निघाले आहेत तर काही लोक वेगवेगळ्या क्लुप्तीचा वापर करून अहमदनगर जिल्हा तसेच इतर जिल्ह्यात पोहचले आहेत. वास्तविक पहाता लाॅकडाऊन व संचारबंदी लागू असताना आणि प्रत्येक जिल्ह्यातील सीमा बंद केल्या असताना हे लोक सीमा ओलांडून आलेच कसे हा प्रश्न पडतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक जिल्ह्यातील सीमा वरील चेक पोस्ट फक्त नावापुरतीच आहेत. आत्ता पर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना बाधीत सापडले होते. ते सर्व जण पुणे मुंबई येथून आपल्या नातेवाईकांकडे रहायला आले होते हे निष्पन्न झाले आहे. अर्थात ते लोक पण आपलेच नातेवाईक आणि आपल्या घरातीलच आहेत. त्यांना अस एकटं वा-यावर सोडून देता येत नाही. तसेच संकटाच्या काळी मदत करणे आणि त्यांचे पाठीमागे उभे राहून त्यांना आधार देणे ही आपलीच जबाबदारी आहे. पण मग या लोकांची तपासणी का केली नाही?

तसेच त्यांना कोरांनटाईन का केले गेले नाही? त्यांची माहिती प्रशासनआणि पोलिस प्रशासन यांना का दिली नाही असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात.  ब-याच वेळी गावातील राजकीय लोक निवडणुका आल्यावर आपल्या गावातील इतर जिल्ह्यात नोकरी, व्यवसाय आणि कामा मुळे गेलेल्या लोकांना आपल्या मदतीला गावात घेऊन येतात. त्यामुळेही कदाचित आता गावातील आणि शहरातील राजकीय लोक आता जनता नाराज होईल म्हणून ठोस भूमिका घेत नसतील. पण निवडणुका आणि आताची परिस्थिती या मध्ये फार फरक आहे. त्यामुळे आता तरी काळजी घेणे आवश्यक आहे. पुणे  मुंबई आणि इतर जिल्ह्यातील आलेले नातेवाईक यांची माहिती प्रशासनाला दिलीच जात नाही. तसेच उगाच कशाला वादात पडायचे म्हणून त्या भागातील नागरिक सुद्धा माहिती देत नाहीत. आणि याचाच परिणाम कोरोनाचा संसंर्ग वाढला आहे. जगभरात जवळपास तीन लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हा कोरोना नावाचा व्हायरस अजुन किती बळी घेणार याचा नेम नाही.  भारतात जवळपास संशयीत कोरोना ग्रस्तांची संख्या एक लाखाचे पुढे गेली  आहे. आपला महाराष्ट्र हा सध्या कोरोनाच्या बाबतीत एक नंबरवर आहे. देशभरातील जनता सुरक्षित रहावी म्हणून  आणि  कोरोना आटोक्यात यावा म्हणून सरकारने चौथ्यांदा सुद्धा 31 मे 2020  पर्यंत  लाॅकडाऊन वाढवला आहे. शासनाचे आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन यांनी पुरेपूर कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न केले आहेतच. पण खरं तर जनतेची पाहिजे तशी साथ प्रशासनाला मिळालीच नाही. काही बेजबाबदार लोकांनी जिल्हा  प्रशासनआणि पोलिस प्रशासन यांचे आदेश पायदळी तुडवले आहेत. अहमदनगर, बीड जिल्ह्यातील अनेक लोक पुणे मुंबई आणि इतर जिल्ह्यात नोकरी साठी आहेत. ते तपासणी न करता आणि प्रशासन यांची परवानगी न घेता आपापल्या गावाकडे व नातेवाईकांकडे आले आहेत. त्यातील काही लोक कोरोना संसर्गित असल्याचे समोर आले आहे . वास्तविक सर्व नियम पाळूनच जर नागरिक आले असते तर कोरोना संसर्गित झालाच नसता. कोरोना सारख्या महामारी ला रोखायचे असेल तर सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे. हे असंच चालू राहिलं तर अजून किती तरी लोकांना या कोरोना महामारी ला बळी पडावे लागेल यात शंकाच नाही . जनता सुरक्षित रहावी म्हणून आता पर्यंत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी,  डाॅक्टर आणि नर्स, प्रशासनचे कर्मचारी, महापालिका प्रशासनातील कर्मचारी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

आता कोरोना अहमदनगर शहरात घुसलाय. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी अहमदनगर शहरातील अनेक भाग हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केला आहे.  नागरिकहो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव ठेवा. परंतु आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील अनेक लोकांनी, सामाजिक संस्था यांनी, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांना चांगली साथ आणि मदत दिली. त्यामुळे जनता अजुन तरी सुरक्षित आहे. प्रशासन कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. तसेच आकाशवाणी, रेडिओ, दुरदर्शन आणि वर्तमानपत्रातून आपले पत्रकार बांधव जनजागृती करत आहेत. 

नागरिकहो, करोना विरुद्धची लढाई आपली आहे, त्यामुळे आपणच स्वतः सर्व नियम पाळलेच पाहिजे. आपल्या परिसरात नवीन, अनोळखी व्यक्ती आल्या तर त्यांची माहिती प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांना देणे आवश्यक आहे. आपल्या एका चुकी मुळे संपूर्ण कुटुंब धोक्यात घालू नये.  कारण कोरोना हा बाहेरच्या देशातुन आणि जिल्यातुन येणारे लोकामुळेच पसरला आहे हे निश्चित झालं आहे.  आता प्रसंग बाका आहे. अशा परिस्थितीत प्रशासन आणि नागरिकांनी मिळून ही लढाई लढणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोना वर मात करू शकतो म्हणून शासनाच्या आदेशाचे पालन करावे ही नम्र विनंती.

घरीच रहा सुरक्षित रहा. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील
सदस्य शांतता समिती अहमदनगर
99 22 545 545

Post a Comment

Previous Post Next Post