नगर, (दि.28) : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानूग्रह अनुदान योजनेअंतर्गत धनादेश वाटप नगर तालुका पंचायत समिती येथे पंचायत समिती सभापती सौ कांताबाई कोकाटे यांचे उपस्थितीत करणेत आले. पंचायत समिती सभागृहात आज दि. २६ मे २०२० रोजी ८ विद्यार्थ्यांच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनूदान धनादेश वाटप जि.प. सदस्य संदेशजी कार्ले, उपसभापती रवींद्र भापकर, माजी सभापती रामदास भोर, गोविंदराव मोकाटे, बाळासाहेब हराळ, प्रवीण कोकाटे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सुनिता ससे ( चिचोंडी पाटील ), रावसाहेब खांदवे ( मांडवे ) छाया नेटके ( शेंडी ) कमल सोळंके ( गुणवडी ), संगिता देठे ( नगर ), विजय क्षिरसागर ( नगर ), प्रमिला काटे ( खडकी ), मंदा जाधव ( केडगाव ) या पालकांना प्रत्येकी ७५००० रू. प्रमाणे धनादेश वाटप करणेत आले. गटविकास अधिकारी संजय केदारे व गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags:
Ahmednagar
