लॉकडाऊनमुळे दिव्यांगांचे हाल : वाकचौरे

जिल्हा परिषदेने रोख रक्कम देण्याची मागणी : जालिंदर वाकचौरे



नगर (दि.25) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामधील दिव्यांगाचे हाल होत आहे. दिव्यांगासाठी विशेष बाब म्हणून वेगळा फंड तयार करावा. जीवनावश्यक वस्तू, औषध उपचारासाठी रोख रक्कमेची मदत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे गेले महिनाभरापासून दिव्यांग व्यक्ती घरामध्ये आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र शासनाने तांदूळ दिले असून रेशनही मिळत आहे. मात्र किराणा बाजार व आजारपणासाठी रोख रक्कमेची आवश्यकता आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने अनेक योजना दिव्यांग व्यक्तींच्यासाठी आहेत. सेस फंडाच्या 5 टक्के रक्कम दिव्यांगासाठी खर्च केली जाते. एक कोटी रुपयांपर्यत ही रक्कम खर्च होते आता दिव्यांगाना खर्‍या अर्थाने मदतीची गरज आहे. ग्रामपंचायत स्तरावर काही दिव्यांगाना किराणा वाटप झाले आहे. मात्र, ही अतिशय तोकडी मदत असून सर्व दिव्यांगाना ही मदत पोहचली नाही. जिल्हा परिषदेने खास बाब म्हणून निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post