सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्‍थापनावरील कर्मचाऱ्यांची माहिती ‘ऑनलाईन’ भरणे आवश्‍यक

नगर, (दि.21) : जिल्‍हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्‍थापनांनी माहे मार्च अखेर कार्यालयामध्‍ये कार्यरत असणा-या मनुष्‍यबळाची माहिती ऑनलाईन भरण्‍याचे आवाहन कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्‍त यांनी केले आहे.

सर्व सार्वजनिक व खाजगी आस्‍थापनांनी माहे जानेवारी ते मार्च या तिमाही कालावधीतील कार्यालयातील आस्‍थापनावर कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱ्यांची माहिती विवरण पत्र (ईआर-1) याविभागाच्‍या https//rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टवर ३० एप्रिल पूर्वी ऑनलाईन भरणे आवश्‍यक आहे. विवरण पत्र विहित मुदतीत ऑनलाईन न भरल्‍यास कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल याची सर्व आस्‍थापनांनी नोंद घ्‍यावी तसेच विवरणपत्र ऑनलाईन भरताना काही अडचणी असल्‍यास कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता, मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी रोड, अहमदनगर (दुरध्‍वनी क्र. ०२४१-२४२५५६६) येथे संपर्क साधवा.

Post a Comment

Previous Post Next Post