कोरोनाच्या संकटात राजकारण बाजुला ठेवा : शरद पवार

मुंबई  (दि.21) : पालघर झुंडबळी प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य करत सरकारची पाठराखण केली आहे. महाराष्ट्राचा नावलौकीक आणि कायदा सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती दाखवण्याचा अभास निर्माण केला जात आहे. पालघरला जे झाले त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे असे शरद पवारांनी सांगितले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, काही तासात राज्य सरकारने खबरदारी घेत पालघर प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली, जे घडले ते चांगले नाही, पण या प्रकारातून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली अशाप्रकारे वातावरण तयार केले जाते पण आज राजकारण करण्याची वेळ नाही. कोरोनाशी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. या संकटाशी लढण्याची जबाबदारी सर्वांवर आहे अशा शब्दात त्यांनी नाव न घेता भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे.

सध्या कठीण परिस्थितीत पोलीस दलातील लोक, वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे, राज्य शासनाचे कर्मचारी हळुहळू उपस्थित होऊ लागले आहेत. या लोकांप्रती आत्मीयता दाखवली आहे. या कर्मचा-यांची आपुलकीने वागताना त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणे आणि विश्वास देणे, आपण सगळे एकत्र आहोत ही भावना निर्माण करणे गरजेचे आहे असेही शरद पवारांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post