नगर ( दि.02) : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व परिमिटरुम व मद्यविक्री दुकानामध्ये ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व अनुज्ञप्त्या, देशी विदेशी, मद्य विक्री दुकाने दिनांक 31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतू सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्गाने बाधीत होणा-या नागरीकांचे वाढते प्रमाण पाहता तसेच देशात व महाराष्ट्र राज्यात लागू केलेल्या लॉक डाऊनचा कालावधी विचारात घेता हा आदेश दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यत वाढविण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने या लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हयात विविध ठिकाणी 133 गुन्हे नोंदवून 85 आरोपींना अटक केलेली आहे. आरोपीच्या ताब्यातून अवैध देशी विदेशी दारु , हातभट्टी व ताडी स्पीरीट असा अंदाजे 36 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल 10 दुचाकी व चारचाकी वाहनांसह जप्त करण्यात आलेले आहे. तसेच प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री करणारे नगर तालुक्यातील अकोळनेर येथील हॉटेल जंगली ढाबा व बोल्हेगाव येथील हॉटेल दोस्ती तसेच अकोले तालुक्यातील शेंडी येथील देशी दारु दुकान या अनुज्ञप्तीधारकांच्या दुकानांमधील मद्यसाठयात तफावत आढळून आल्याने अमर्यादीत कालावधीसाठी निलंबीत करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार काही दिवसात सर्व अनुज्ञप्ती मधील त्यांचा प्रत्यक्ष मद्यसाठयाची मोजणी करण्यात येणार आहे. त्यात सरासरीपेक्षा जास्त फरक आढळून आल्यास अनुज्ञप्ती अमर्यादित कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस एस सराफ, ए बी बनकर, ए व्ही पाटील, डी एल जगताप, बी टी घोरतळे, आर डी वाझे , दुय्यम निरीक्षक सुर्यवंशी , धोका, घोडे , पाटील, छत्रे, बडदे, गोलेकर व सर्व जवान यांनी विविध ठिकाणी कार्यवाहीमध्ये सहभाग घेवून गुन्हे नोंदविले आहेत