अहमदनगर जिल्हयात आता एकूण 14 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनाबाधितांचा आकडा 6 ने वाढला
पुण्याच्या एन आय व्हीं कडून आज 51 जणांचे अहवाल प्राप्त
नगर (दि.02) : नगरमध्ये आणखी 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 झाली आहे. यामध्ये दोन परदेशी, दोन मुकुंदनगर तर दोन संगमनेर येथील नागरिक, परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
नगरमध्ये कालपर्यंत ८ बाधित होते. त्यापैकी शहरातील पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णावर यशस्वी उपचार झाल्याने त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यास २ दिवसांपूर्वी घरीही सोडण्यात आले होते. त्यामुळे नगरकरांची धाकधूक काहीशी कमी झाली होती. परंतु नंतर शहरात तसेच जामखेडमध्ये असे एकूण ८ बाधित आढळलेले होते. बुधवारी (दि.१) पुण्याच्या एन.आय.व्ही.कडे ५१ नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल गुरुवारी (दि.२) दुपारी प्राप्त झाला. त्यापैकी ६ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा प्रशासनाने आता बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे, त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवणे याला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.