एसपी अखिलेश कुमार सिंह यांनी पदभार स्वीकारला


 एसपी अखिलेश कुमार सिंह यांनी पदभार स्वीकारला

नगर (दि.02) : गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकपदी आता अखिलेशकुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली असून कामाला सुरुवात केली आहे.

नगर जिल्ह्याला अखिलेश कुमार सिंह यांच्या रुपाने नवीन पोलिस अधीक्षक मिळाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा याबाबत गृह विभागाने आदेश काढले होते. अखिलेश कुमार सिंह हे मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंंडल सातचे उपआयुक्त पदावर कार्यरत होते. आता त्यांनी नगरच्या पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे हाती घेतली आहे. यापूर्वीचे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू हे डिसेंबर 2019 मध्ये प्रशिक्षणासाठी परदेशात गेल्याने, सागर पाटील यांनी प्रभारी म्हणून काम काज पाहिले होते.

गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा पोलिस अधीक्षक पद रिक्त होते. महाराष्ट्रात विस्ताराने सर्वांत मोठ्या असलेल्या जिल्ह्याला पोलिस अधीक्षक लवकर मिळावेत, म्हणून सातत्याने मागणी होत होती. सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या पार्श्‍वभूमीवर अखिलेश कुमार सिंह हे पोलिस अधीक्षक म्हणून मिळाल्याने त्यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post