बहुरुपी समाजाने अनुभवले देवरुपी पोलीस...

नगर शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम

बहुरुपी समाजाला जिवनावश्यक वस्तुंचे वाटप 

नगर (दि.09) : समाजामध्ये अनेेक घटक असे आहेत की जे रोज काम करुन आपला उदरनिर्वाह भागवत असतात. यामध्ये प्रामुख्याने सर्वाच्याकडुन दुर्लक्षीत असलेला घटक म्हणजे बहुरीपी हा होय. आज त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून त्याच्या घरापर्यंत कोण पोहचणर अशी परस्थिती असताना जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस उपअधीक्षक सागर पाटील, यांच्या सुचनेवरुन गुरुवारी पोलिस शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांनी बहुरुपी समाजातील कुटुंबियांना जिवनावश्यक वस्तु दिल्या असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बहुरुपी कुटुंबियांनी तर त्यांना देवरुपी पोलिस म्हंटले आहे.

समाजावर येणारे प्रत्येक संकटात सर्व प्रथम आपल्या सर्वांना गरज पडते ती पोलीसांची, मग कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्‍न असो, आणीबाणी परस्थिती, नैसर्गिक संकट असो किंवा जागतीक पातळीवर निर्माण झालेले कोरोना या संसर्गजन्य विषाणुजन्य आजारामुळे निर्माण झालेले संकट असे, मात्र, सर्वच परस्थिती पोलिस दलाची ओळख होते, ती त्यांच्या शिस्तप्रिय कर्तव्यातुन, समाजातील सर्व स्तरातील नागरीकांना त्यांचे शिस्तबध्द पणामुळे त्यांची अपुलकीजन्य भिती वाटत असते. अनेकदा त्यांच्यावर टिका होत असते, कारण ते नियम मोडणार्‍यांना नियमांची अंमलजावणी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्रE आज त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोराना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यायासह नगर जिल्हा प्रशासन व नगर जिल्हा पोलीस दल दिवस - रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे. अशा परस्थितीत समाजातील काही ठिकाणी गोरगरीब नागरीक जे दररोजचे उपजिवीकेवर आपल्या कुटंबांचे पालन पोषण करतात त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र राज्य प्रशासन समाजातील कोणत्याही व्यक्ती अन्ना शिवाय राहणार नाही याकरता उपाय योजना करत आहेत. अशी परीस्थीती असतांना नगर शहर पोलीसांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल बहुरुपी समाजाच्या नागरीकांच्या भावना जाणुन घेतल्या असता त्यांनी पोलीस हे त्यांच्यासाठी धावुन आलेले,  पोलीस नसुन ते देव आहेत असे मनोगत व्यक्त करत ते भारावुन गेले. त्यांनी नगर शहर  डीवायएसपी संदीप मिटके नगर शहर पोलिस दलाचे आभार मानले आहेत.
नागरीकांनी सुचनांचे पालन कराव : संदीप मिटके 

यावेळी नगर पोलिस दलाच्या वतीने शहर डीवायएसपी संदीप मिटके यांनी कोरोना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता प्रशासन उच्च स्तराच्या उपाय योजना करत आहेत. नागरीकांनी घाबरुन न जाता प्रशासनातर्फे देण्यात आलेले सुचनांचे काटेकोर पणे पालन करावे.  अत्यावश्यक कारणा शिवाय  घराबाहेर पडु नये, रस्त्यावर फिरू  नये, गर्दी करू नये,  प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नये, नगर पोलिस दलास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post