नवी दिल्ली, (दि.16) : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदेही बंद आहेत. वृत्तपत्र आणि माध्यमांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत गुगलने पुढाकार घेत माध्यमांसाठी आपत्कालिन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावरील छोट्या, मध्यम आणि स्थानिक वृत्त प्रकाशकांसाठी गुगलने ‘जर्नालिझम इमर्जन्सी रिलिफ फंड’ची सुरुवात केली. गुगलने यासंदर्भात काल ही घोषणा केली.
वृत्तपत्र प्रकाशकांना या निधीसाठी अर्जही करता येणार आहे. २९ एप्रिल ही अर्ज करण्याची अखेरची तारीख असेल. अर्ज मिळाल्यानंतर कोणाकोणाला आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे गुगलकडून जाहीर करण्यात येईल.
हजारो लोकांना एकमेकांशी जोडण्यात स्थानिक माध्यमांची भूमिका मोठी असते. कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील रोजगारांवर परिणाम होत आहे, असे गुगलच्या उपाध्यक्षांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ज्या संस्थेत २ पासून १०० पर्यंत पूर्णवेळ पत्रकार आहे त्याच कंपन्या यासाठी अर्ज करू शकतात. तसेच संबंधित संस्थेची डिजिटल उपस्थिती एक वर्ष असावी असेही त्यांनी नमूद केले आहे. तर दुसरीकडे १०० पेक्षा अधिक पूर्ण वेळ कर्मचारी असलेल्या कंपन्यांनाही अर्ज करता येणार आहे. परंतु त्या कंपन्यांना निधी द्यायचा किंवा नाही गुगल तपासूनच नंतर ठरवणार आहे.
‘गुगल.ओरजी’कडून १ दशलक्ष डॉलर्स पत्रकारांना मदत करणा-या दोन संस्थांना देण्यात येणार आहे. यामध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्स आणि कोलंबिया जर्नालिझम स्कूल, डार्ट सेंटर फॉर जर्नालिझम अँड ट्रॉमा यांचा समावेश असेल अशी माहिती गुगल न्यूझचे उपाध्यक्ष रिचर्ड जिंग्रस यांनी दिली. संबंधित संकेतस्थळावर जाऊन संबंधित संस्थांना अर्ज करता येणार आहे.

Tags:
Maharashtra