नगर
(दि.20) : आज लॉकडाऊनच्या काळात सर्व मुलं घरी आहे, आणि मुलं आपला जास्त
वेळ टीव्ही आणि मोबाईल या मध्ये घालत आहे, या मुळे मुलांच्या आरोग्याचा
प्रश्न उपस्थित झाला आहे, आणि यामुळे श्री रामवतार मानधन चॅरिटेबल ट्रस्टचे
महावीर मल्लखांब योगा ट्रैनिंग सेंटरने गेल्या काही दिवसापासून घरून
योगा, फिटनेस याचा सराव सुरु केला आहे याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
आज
सुमारे 150 मुलं मुली रोज योगा आणि फिटनेस करत आहे, या मुळे सर्व पालक
वर्गातुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे. योगा सोबतच मुलांना पौष्टिक आहार कसा
असावा, रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवावी आणि या सोबतच मुलांना योगा या
विषयावर चित्रकला असे अनेक उपक्रम राबवत आहोत.
आज
मुलांसोबत घरातील सर्वच योगा करत आहे. विध्यार्थीनी गार्गी मोहोळे हिने
योगा आणि फिटनेस साठी तर स्वतः ऐक साप शिडी तयार केली याचा हि सर्व आनंद
घेत आहे. या सर्व मुलांना रोज फोन कॉल, विडिओ कॉल, एस..एम.एस मार्फत उमेश
झोटिंग, प्रणिता तरोटे, अप्पा लाढाणे, ऋतुजा गिते, ऋतुजा वाल्हेकर, अक्षता
गुंडपाटील हे मार्गदर्शन करत आहे.
