ना.थोरातांच्या यशोधन कार्यालयातून कोरोना काळात 21522 तक्रारींचे निवारण


 काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरातून सुमारे 1 लाख नागरिकांचे प्रश्न मार्गी

संगमनेर, (दि.20) : राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षातून सुमारे 76 हजार नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले असून  संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात 24 X 7 या स्वतंत्र आपत्कालीन कक्षामार्फत 21522 नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यात झाले आहे.

राज्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकार पातळीवर व पक्ष पातळीवर ना.बाळासाहेब थोरात हे अत्यंत महत्वपूर्ण काम करत आहे. राज्यातील स्थलांतरीत नागरिक, आजारी व्यक्ती यांसह गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, निवास व्यवस्था, जेवण व्यवस्थेसाठी तात्काळ पाठपुरावा होवून मदत मिळावी यासाठी यशोधन कार्यालयात तीन शिफ्ट मध्ये सोशल डिस्टन्स राखून 15 कर्मचारी अविरतपणे काम करत आहे. या कक्षामार्फत राज्यभरातून येणारे विविध प्रश्न नोंदविले जात असून संबंधित विभागामार्फत तातडीने प्रश्न सोडवून नागरिकांना सुविधा दिल्या जात आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू न मिळणे, जादा दराने विक्री व उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक समस्या या बाबतच्या समस्या सोडविल्या जात आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने कायम देशहित व नागरिकांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरोना या विषाणूने जगभरासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. कोरोना हे मानव जातीवरील मोठे भयंकर संकट आहे. याचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारला सर्वत्तोपरी मदत करत आहेत. याच अनुषंगाने  महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यभरात सक्रियतेने काम करत असून गरजूंना मदत करत आहे. यामुळे या कोरोना आपत्कालीन कक्षामुळे राज्यातील सुमारे 1 लाख नागरिकांना मदत मिळाली आहे. हे काम 24 तास सुरू असून याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 02425 - 227303,227304 व 9689304304, 9689113983 या क्रमांकावर तसेच व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून 9527037037 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन काँग्रेस कमिटी, इंद्रजितभाऊ थोरात व यशोधन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post